सामाविष्ठ माहिती
महाबीज.
महाबीज, म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ही एक बियाणे क्षेत्रात काम करणारी राज्य शासन अंगीकृत अग्रगण्य संस्था आहे. महाबीजने स्थापना झाल्यापासून आजतागायत बियाणे क्षेत्रात त्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाने बाजारात विश्वासहार्यता निर्माण केली आहे. तसेच शेतकरी बांधवही महाबीज कडे गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादने तयार करणारी व विक्री करणारी संस्था म्हणून पाहतात. त्यातच भर म्हणून आता महाबीज जैविक उत्पादनामध्ये उतरले आहे. महाबीजचे विविध जैविक उत्पादने गुणवत्ता पूर्ण, स्वस्त दरात, आकर्षक पॅकिंग बाजारात उपलब्ध करून दिली आहेत.
जैविक खते म्हणजे काय.
जिवाणू खत सेंद्रिय व सजीव असून त्यामध्ये कोणतेही अपायकारक टाकाऊ निरुपयोगी घटक नाही, यालाच जिवाणू संवर्धके सुद्धा म्हणतात. जैविक खते किंवा जिवाणू संवर्धन म्हणजेच उपयुक्त अशा जिवाणूंचे निर्जंतूक वाहकामध्ये केलेले मिश्रण जे बियाणे रोपे अथवा जमिनीत वापरल्यास त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते व नत्र स्थिरीकरण तसेच स्फुरद पालाश विद्राव्याच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जिवाणू खतामध्ये रायझोबियम, अझॅटोबॅक्टर, पीसीबी, के एम बी यासारखे जिवाणू आहेत त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
रायझोबियम
रायझोबियम नावाचा जिवाणू असून तो वातावरणातील नत्र सहजीवी पद्धतीने मुळातील गाठी मध्ये स्थिर करतो, हे स्थिर नत्र पिकांना सहज उपलब्ध होते, हे जिवाणू फक्त शेंगवर्गीय द्विदल पिकांसाठी उपयोगी पडते परंतु वेगवेगळ्या पिकांसाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे लागते सोयाबीन गट -सोयाबीन -रायझोबियम जापोनिकम. चवळी गट– चवळी, भुईमूग, तूर, उडीद, मूग, गवार, ताग, -रायझोबियम स्पे. हरभरा गट- रायझोबियम सीसेरी
स्फुरद विरघळणारे जिवाणू.
हे जिवाणू जमीनतील विद्राव्य स्वरूपात स्थिर झालेले स्फुरद विरघळून ते पिकांना उपलब्ध करून देतात पीएसबी हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरता येते.
अझॅटोबॅक्टर.
जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. हे जिवाणू तृणधान्य पिकांना उपयोगी पडते गहू, ज्वारी, बाजरी, भात इत्यादी पिकांसाठी वापरले जाते.
पालाश उपलब्ध करणारे जिवाणू.
पालाश हे पिकांसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य आहे. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम पालाश उपलब्ध करणारे जिवाणू करतात.
के. एम. बी.
के एम बी हे सर्व पिकांसाठी वापरता येते
जिवाणू खते वापरण्याची पद्धत.
बीज प्रक्रिया 100 मिली प्रति दहा किलो बियाण्यासाठी.
ठिबक सिंचनाद्वारे एक ते दोन लिटर प्रति एकर क्षेत्रासाठी.
पुनर लागवड व रोपे बुडवणे 500 मिली प्रति एकर.
जमिनीत देण्यासाठी दोन लिटर प्रति एकर जिवाणू खत 50 किलो शेणखतात मिसळून समप्रमाणात टाकावे.
जैविक खते वापरताना घ्यावयाची काळजी.
ज्या पिकांसाठी शिफारस असेल त्याच पिकांच्या जिवाणू खतांचा वापर करावा.
कीटनाशके बुरशीनाशके व रासायनिक खतासोबत जैविक खते मिसळू नयेत.
बीज प्रक्रियेसाठी वापर करत असताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.
जिवाणू खत हलक्या हाताने सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात लावावे.
कीटकनाशक लावायचे असल्यास अशी प्रक्रिया करून शेवटी जिवाणूखत लावावे.
जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा.
ट्रायकोडर्मा विरिडी 1.5% पाण्यात विरघळूणारी भुकटी एक जैविक बुरशीनाशक आणि सूत्र कमी नाशक असून याचा उपयोग जमीन व बियाणाद्वारे प्रसारित रोगांच्या व्यवस्थापनासाठी केला जातो.
फायदे
बीज प्रक्रिया केल्याने उगवन शक्ती मध्ये वाढ होऊन बीज अंकुरण जास्त प्रमाणात होते.
जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजवून देण्यास तसेच जमीन सुधारण्यास मदत होते.
बियाण्यावरील रोग पसरवणाऱ्या बुरशींची वाढ न होऊ देता जमिनीमधील रोगकारक हानिकारक बुरशीचा नायनाट करते.
महाबीजचे जैविक उत्पादने का वापरावी
महाबीज ही एक शासन अंगीकृत बियाणे उत्पादक व विक्रेती कंपनी आहे. महाबीज ने बियाणे क्षेत्रांमध्ये शेतकरी बांधवांमध्ये राज्यभरात एक विश्वासार्हता प्राप्त केली आहे. महाबीजचे सर्वच उत्पादने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असतात. महाबीजच्या बियाण्याप्रमाणे महाबीजने त्यांची गुणवत्ता त्यांच्या जैविक उत्पादनामध्ये सुद्धा राखली आहे. महाबीजचे जैविक उत्पादने हे आकर्षक पॅकिंग, स्वस्त दर व उच्च गुणवत्तेचे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक जैविक उत्पादनात जितके जिवंत जिवाणू असणे बंधनकारक आहे त्याच्या दुप्पट प्रमाण हे महाबीजच्या जैविक उत्पादनामध्ये आहे. म्हणून शेतकरी बांधवाणी महाबीज ची जैविक उत्पादने वापरावी.
महाबीज चे उत्पादने विकत घेण्यासाठी संपर्क कोठे करावा.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मर्या चे मुख्य कार्यालय अकोला येथे आहे तर महाबीज चे जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यालये आहेत. सर्व जिल्ह्यात जिल्हा व्यवस्थापक महाबीज च्या अधिकृत विक्रेत्यामार्फत महबीज ची उत्पादने विक्री करतात. आपल्या जिल्ह्यातील महाबीज च्या विविध उत्पादनासाठी व माहिती करिता खालील तक्त्या मधील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावा.
क्र | जिल्ह्याचे नाव | संपर्क क्रमांक |
1 | अकोला | 8669642764 |
2 | अमरावती | 8669642758 |
3 | बुलढाणा | 8669642783 |
4 | वाशिम | 8669642762 |
5 | यवतमाळ | 8669642750 |
6 | जळगाव | 8669642722 |
7 | नाशिक | 8669642710 |
8 | धुळे | 8669642726 |
9 | जालना | 8669642713 |
10 | संभाजी नगर | 8669642716 |
11 | अहमदनगर | 8669642730 |
12 | बीड | 8669642718 |
13 | पुणे | 8669642774 |
14 | सातारा | 8669642740 |
15 | सांगली | 8669642766 |
16 | कोल्हापूर | 8669642743 |
17 | नागपुर | 8669642785 |
18 | वर्धा | 8669642784 |
19 | चंद्रपूर | 8669642757 |
20 | भंडारा | 8669642721 |
21 | परभणी | 8669642779 |
22 | लातूर | 8669642739 |
23 | नांदेड | 8669642727 |
24 | धाराशीव | 8669642734 |
25 | हिंगोली | 8669642735 |
26 | सोलापूर | 8669642791 |
आम्ही बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करत नाही आणि बीजप्रक्रिया साठी महाबीज चे प्रोडक्ट वापरतो बीजप्रक्रिया चा रिझल्ट छान येतो.